वाटा केशरी
कोवळ्या
मना क्वचित
स्पर्शल्या
अश्या सामोरी
येवून
का अवचित ठाकल्या
वाटा होत्याच
मोडल्या
दूर ओढयात
बुडाल्या
नव्या वळणी फिरून
उगा खुणावू
लागल्या
साऱ्या तुटल्या
जगाच्या
गाठी बुद्ध्याच सोडल्या
हाका ओढाळ तरी का
मग माझ्यात रुतल्या
गाव परके निष्ठुर
बाता धनाच्या
चालल्या
मन विरक्त उदास
गोष्टी कुणा न
कळल्या
होते भ्रम जरी कळे
साऱ्या सुखाच्या
सावल्या
आस कुणाची जीवाला
पाय थांबती
कश्याला
वाटा उसन्या
परक्या
दत्ता कशाला दाविल्या
जाणे राहिले
पुढती
सुख पायास
फाटल्या
डॉ.विक्रांत
प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा