गुरुवार, १२ नोव्हेंबर, २०१५

सुलतान








http://allindiaroundup.com/news/was-tipu-sultan-the-great-or-a-tyrant-a-look-into-the-history/

अत्याचारी समशेर
उगारून प्रजेवर
गांजले छळले अन  
भ्रष्ट केले बळावर

जनानखाने भरले
पशु वृत्तीने भोगीले
म्हणे भूमिपुत्र तया
सदा मातेस लांछिले
 
श्रद्धेवरी घाव त्याने
पावित्रही विटंबले
स्वत:साठी भोगासाठी
फक्त रक्तास सांडिले

मरणाने मेला जरी
स्वतःसाठीच जगला
विष पण वाढवून  
कालवून इथे गेला

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/


बुधवार, ११ नोव्हेंबर, २०१५

| दत्त प्रेमसुख |






काय सांगू सखी | दत्त प्रेमसुख |
अलोट कौतुक | शब्द उणे ||
स्मरताच मनी | तात्काळ येवूनी |
आनंदाचा धनी | केले मज ||
सुकुमार देह | बैराग्याचा वेष |
जटाजुट केस | शोभिवंत ||
दुसरा भास्कर | जणू धरेवर |
कोंदाटे अपार | देह दीप्ती ||
लेवून रुद्राक्ष | खडावा पायात |
त्रिशूळ हातात | भिक्षापात्र ||
भस्माचिया रेषा | साऱ्या देहावर |
रूप दिगंबर | अवधूत ||
भगवे कौपिन | आवडी लेवून |
त्रिमूर्ती त्रिगुण | देहाकार ||
हरपले भान | मनाचे उन्मन |
 जाग ध्यान स्वप्न | एकाकार  ||

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/


मंगळवार, १० नोव्हेंबर, २०१५

दत्त माझा






कर्ता करविता
पथी चालविता
वनी सांभाळिता
दत्त माझा ||१
आणुनी संसारी
प्रारब्धी कुहरी
भोगवून सारी
बंध तोडी ||२
भोगता कामना
सोसता यातना
विसर पडेना
कृपा त्याची ||३
दिसो जन्मोजन्मी
तेच ते चरण
दत्त नारायण
वसो मनी ||४

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/


स्वाती राजोपाध्याय..(एक निरोप)





स्वाती नक्षत्रात पडणारे पावसाचे थेंब
शिंपल्यात मोती होतात
स्वातीच्या सहवासाचा आणि अस्तित्वाचा
हा योग सर्वजन जाणतात
स्वाती राजोपाध्याय यांच्या सहवासातही
आपल्याला दिसतात आणि आपल्यात उमलतात
त्यांचे शुभ्र धवल मोतियासारखे गुण

निरपेक्ष प्रेम, आनंद, चारित्र्य
प्रामाणिकता आणि कर्तव्य समर्पण
प्रसिध्दीपासून सदैव दूर
आपण आणि आपलं काम बरं
या भूमिकेत सहज सदैव वावरत
आपलं काम चोख करत
त्या  राहिल्या सदैव आपल्यात
एखाद्या सेवाव्रतीगत

राजकारण करणं कुणाशी भांडणं
छक्केपंजे खेळणं लावालावी करणं
या गोष्टी त्यांच्याजवळ
कधीही फिरकल्याच नाही
नव्हे त्यांची सावलीही त्यांच्यावर
कधीही पडली नाही
असं हे शांत सोज्वळ सहज जीवन
आजवर आपला एक अविभाज्य भाग होतं
पानाआड दडलेल्या फुलासारखं
सुगंधित अध्यात्मिक आत्ममग्न
हजारो लोकांच्या उपयोगी पडलेलं
अन सगळ्यापासून अलिप्त असलेलं
आपण खरच नशीबवान होतो
त्यांच्या सोबत काम करीत होतो .

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे


झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...