जेव्हापासून कळले मजला कि जीवनाचे नाव मरणे आहे . डोक्यास बांधून कफ़न मी ,त्या मारेकऱ्यास शोधतो आहे. (अनुवादित)
सोमवार, २५ मे, २०१५
शनिवार, २३ मे, २०१५
दिलपाके मेट्रन
दिलपाके सिस्टरांना पहिले की
मला आठवण येते ती
एका रानातील पावुलवाटेची
वर्षोनुवर्ष पावुसपाणी उनवारा
सोसत उभी असलेली
घट्ट स्पष्ट पक्की
ठामपणे पुढे पुढे जाणारी
झाडाझुडपाची पर्वा न करता
चढ उतारांना दाद न देता
सारे जंगल आपल्यात
सहज सामावून घेणारी
प्रेमळ अन हळवी
कठोर पण रुळलेली
कधी गूढ तटस्थ
पण आपलीशी वाटणारी
बऱ्याचवेळा ही वाट
सरळ डांबरी राजेशाही मार्गांना
आपल्या पासून दूर ठेवते
त्यांच्याशी फटकून वागते
स्वत:चे स्वातंत्र्य अबाधित ठेवत
निश्चित केलेल्या मार्गावरून चालते
ही वाट जाते
निर्जर जागेची भीती न बाळगता
फुलबागेची आशा न धरता
तकलादू खोटीनाटी तोरणं शोभेची
सहज झुगारून देते
हरवलेल्या पांथस्थाला जवळ करते
आईची माया देवून
गावात आणून सोडते
खरतर या रानवाटेला जायला
हा आडमार्ग जाणायला
सारेच घाबरतात
पण या वाटेची मवाळ माती
आणि हिरवी सावली
ज्यांना मिळते ते तिचेच होतात
आपल्या जवळून वाहणारी ही वाट
आता वळण बदलणार आहे
दूरवर आणखी कुठे
वेगळ्या दुनियेत जाणार आहे
तसे तर प्रत्येक वाटेशी
आपले नाते असते
कधी घडीभरचे कधी जन्माचे
पण या वळणाऱ्या वाटेशी
असलेले आपले ऋणानुबंध
आपले नाते
सदैव अक्षय राहावे
ही सदिच्छा बाळगून
पुनः पुन्हा भेटण्यासाठी
आपण तिचा निरोप घेवू यात
विक्रांत प्रभाकर
गुरुवार, २१ मे, २०१५
मिटिंग
मिटिंग
प्रत्येक मिटिंग म्हणजे एक
पोटात कळ येणे असते
अन निष्पत्ति काय होणार
कधीच कुणा माहित नसते
तरी पण प्रत्येक वेळी
त्याची तयारी करावीच लागते
पेपर पाणी घेवून काखेत
चक्कर मारावीच लागते
तसे पाहिले तर मिटिंगीत
कुणी फाशी देणार नसते
बोलले जर फार कुणी
मना लावून घ्यायचे नसते
पण पोटातील कळेपेक्षा
चकरा मारून जातो त्रासुन
रोज रोज धावून कावून
जातो पिकुचे बाप होवून
कधी फतवा निघेल ते
कुणालाही माहित नसते
अठरा वीर सज्ज सदैव
एक पावुल दारात असते
तरीही तीन वाजता रोज
मनामध्ये प्रार्थना उमटते
आणि पांच वाजल्यानंतर
मन उगाच भरून येते
पण शेवटी कळच ती
तिचे काही खरे नसते
पेपर पाणि सज्ज ठेवून
सुसाटपणे निघणे असते
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in
मंगळवार, १९ मे, २०१५
स्पंद तुझ्या हृदयीचा
स्पंद तुझ्या हृदयीचा
उतरुन या कणाकणात
अस्तित्वाचा अर्थ कळला
तू माझ्यात मी तुझ्यात
पांघरवा मेघ देह तव
मी आकाश तुझे व्हावे
वेगाळले श्वास कशाला
तुझे मी माझे तू घ्यावे
छळता दु:ख तुजला
वेदना माझ्यात यावी
डोळ्यातीलआसवे तव
माझ्या डोळ्यातून गळावी
देशील तू वेदना वा
येशील पुष्प घेवुनी
एक हे आयुष्य काय
लाख देईन उधळूनी
डॉ .विक्रांत प्रभाकर तिकोणे
kavitesathikavita.blogspot in
उतरुन या कणाकणात
अस्तित्वाचा अर्थ कळला
तू माझ्यात मी तुझ्यात
पांघरवा मेघ देह तव
मी आकाश तुझे व्हावे
वेगाळले श्वास कशाला
तुझे मी माझे तू घ्यावे
छळता दु:ख तुजला
वेदना माझ्यात यावी
डोळ्यातीलआसवे तव
माझ्या डोळ्यातून गळावी
देशील तू वेदना वा
येशील पुष्प घेवुनी
एक हे आयुष्य काय
लाख देईन उधळूनी
डॉ .विक्रांत प्रभाकर तिकोणे
kavitesathikavita.blogspot in
रविवार, १७ मे, २०१५
गायकवाड सिस्टर
या जगात घेणारे
खूप असतात
अनेक मार्गांनी
अनेक प्रकारे
कमाई करणारे
खूप असतात
पण देणारे
क्वचित दिसतात
देण्यामध्ये
किती सुख असत
हे जर
कुणाला पहायचे असेल
तर त्यांनी
गायकवाड सिस्टरांना भेटाव
या रुग्णालयातील
कुणीही व्यक्ती
रिटायर होवो
सिस्टरांनी छोटी मोठी
भेटवस्तु दिली नाही
असे कधी झाले नाही
त्यात त्यांची दानत तर आहेच
पण उपकार स्मरणाची
प्रमाणिकता आहे
आपले रुग्णालय एक
कुटुंब आहे ही जाणीव आहे
असा प्रत्येकाला बांधून ठेवणारा
हा स्नेहाचा धागा
आज आपल्यातून सूटा होतोय
म्हणजे निवृत्त होतोय
त्या जात आहेत म्हणून
खंत तर होतच आहे
पण त्यांनी दिलेले
निरपेक्ष प्रेम सदैव
आपल्या स्मरणात राहील
यात संशय नाही
विक्रांत प्रभाकर
kavitesathikavita.blogspot.in
गुरुवार, १४ मे, २०१५
माक्याची आई (आजी.)
पिकलेल्या पानासारखी
एक दिवस आजी
हळूच गळून पडली
आवाज नाही
धडपड नाही
देवघरातील दिव्यागत
गुपचूप विझून गेली
गावाहून आणले तेव्हा
थोडासाच जीव होता
कुणामध्ये अडकला
ते तेव्हा कळत नव्हता
लुकलुकणारे तिचे डोळे
कष्टाने उघडत होते
शाळेतील पोरे आम्ही
मरणाची चाहूल नव्हती
आजी सिरीयस आहे किती
मुळीसुद्धा कळत नव्हते
आम्हा सर्वास तिने पाहिले
मुकेपणाने.. खुणेवाचून..
अन डोळे मिटून घेतले
पुन्हा न कधी उघडले
तोच दिवस होती ती
अन मग निघून गेली
परक्या गावी कुठल्या घरी
तिची संघर्ष यात्रा संपली
परी भवती माणसं होती
तिची प्रिय जिवलग लाडकी..
तेच तिचे सर्वस्व होते
तिने रुजवले सांभाळले
जीवापाड अन जपलेले
अफाट मेहनत करता करता
एकच स्वप्न तिने पाहीले
नव्या पिढीचे जग सुखाचे
बहु कष्टाने तिने रचले
त्या तिच्या बलिदानाने
धडपडण्याने दूरदृष्टीने
सौख्य नांदते या घरात
सदैव ती या घराची
गृहदेवता निर्विवाद
अन जाणवतो कणाकणात
आम्हा तिचा आशीर्वाद
विक्रांत प्रभाकर
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)
झाड
झाड **** या किनाऱ्याला मी चालत आहे मी माझ्यातच रुजत आहे मी झाड होत आहे इथले पाणी खोलवर माझ्या आत झिरपत आहे तोच मी जरी काह...
-
तुझे डोळे ***** तुझे डोळे चांदण्यांचे बावरल्या हरीणीचे दूर कुठे अडकल्या गायीच्या गं दावणीचे . तुझे डोळे नवाईचे घनदाट...
-
झाकलिया घटीचा दिवा । नेणिजे काय झाला केधवा । यारीती जो पांडवा । देह ठेवी ...ज्ञानेश्वरी मरण ***** असे हवे रे सुंदर मरण ज्यात ओघळून जाईल ज...
-
अशोक कोकणे श्रद्धांजली *********** महाड मधील आमचे घरमालक कोकणे, भाई अन् ताई यांना असलेली पाच मुले, विजय दिलीप अशोक प्रदीप आणि र...
-
अधिक देखणे तरी निरंजन पाहणे भावार्थ ******************************** अधिक देखणे तरी निरंजन पाहणे योगीराज विनविणे मना आले वो माय...
-
महात्मा ज्योतिबा फुले ****** ज्योतीबा, तू लावलेल्या वटवृक्षांच्या सावलीत जगत आहोत आम्ही समतेची स्वातंत्र्याची फळे चाखत आहोत आम्ह...
-
पळस ***** भर उन्हाळ्यात रणरणत्या उन्हात जात असता उजाड रानावनातून अचानक त्या तपकिरी सुकलेल्या हिरवट पिवळट झाडीमध्ये दिसतो ...
-
देव देश अन धर्मासाठी ********** जन्म देवासाठी जावो हा सगळा भावभक्ती मळा फुलो सदा ॥ देह देशासाठी जावो हा सगळा ...
-
जाहलो पतित हरवून वाट दिवसाच रात चालतांना || डोळ्याला पडळ दिसतच नाही धावाधाव काही कामा नये || देवून हाकारे होय ...
-
दु:खाने चिंब भिजलेली कविता वाचतांना दु:खाने कदमदलेले जीवन ओढत चालतांना किती आधार वाटतो मला त्या शब्दांचा शब्द सा...
-
विषण्ण दसरा कालच्या विषण्ण करणाऱ्या घटनेचे मनावर पडलेले घाव घेऊन आपण साजरा करतोय दसरा. जीवन मरण सुख दुःखाचे हे चक्र असेच चालू राह...



