जेव्हापासून कळले मजला कि जीवनाचे नाव मरणे आहे . डोक्यास बांधून कफ़न मी ,त्या मारेकऱ्यास शोधतो आहे. (अनुवादित)
गुरुवार, २३ ऑक्टोबर, २०१४
तू म्हणजे तुझे प्रेम
तू म्हणजे
तुझे प्रेम
अन
तुझे माझ्यावरील
प्रेम म्हणजे
एक
प्रश्न चिन्ह
पण
माझे तुजवरील
प्रेम म्हणजे
तुझ्यावरच्या
कविता
या कविता
म्हणजे
मला मिळालेले
जीवनाचे
प्रयोजन
अन तू जरी
दुरावलीस
तरीही
हे प्रेम
तसेच राहीन
कारण
बरसणाऱ्या सुगंधावर
फुलांचा हक्क
कधीच नसतो
विक्रांत प्रभाकर
बुधवार, २२ ऑक्टोबर, २०१४
मला कधीच डेअरिंग नव्हते
मला कधीच
डेअरिंग नव्हते
तिला विचारायचे
तिला कधीच
डेअरिंग नव्हते
माझे व्हायचे
माझे होणे
तसा व्यवहार
होता तोट्याचा
शुद्ध सुवर्ण
कर्णफुलापुढे
व्यर्थ फुलोरा
क्षणिक फुलांचा
बाजार पाहिलेली
ती आता
फसणार नव्हती
एकदा चुकलेली
ती आता
ठकणार नव्हती
काही गोष्टी
आयुष्यात किती
उशिरा भेटतात
उन्मळलेल्या
वृक्षावरही कधी
मोहर फुलतात
विक्रांत प्रभाकर
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
वारी
वारी ***** महाद्वारी दाटीवाटी लाखो भक्त चालतात आषाढीच्या सोहळ्यात धुंद होत नाचतात मैलोमैल रांग इथे तासोंतास लागतात क्षणभर भेटी...
-
अधिक देखणे तरी निरंजन पाहणे भावार्थ ******************************** अधिक देखणे तरी निरंजन पाहणे योगीराज विनविणे मना आले वो माय...
-
गणेश आदीमायेच्या लेकरा रूप कुंजर सुंदरा मुळारंभ श्री ओंकारा माझे नमन स्वीकारा चौदा विद्येचा तू स्वामी न...
-
वारी ***** महाद्वारी दाटीवाटी लाखो भक्त चालतात आषाढीच्या सोहळ्यात धुंद होत नाचतात मैलोमैल रांग इथे तासोंतास लागतात क्षणभर भेटी...
-
धुनी ***** माय नर्मदा प्रवाही गेला ओंडका वाहत किती पार केली गावे किती ओलांडले घाट जल गेले हरपून नील रत्न सागरात परी राहिला ओंड...
-
उगाच या वाटा पायास फुटती क्षितिजी खिळती आखलेल्या || डोळ्यांची बाहुली भिरभिरे डोही खोल किती काही कळेचिना || नभी उग...
-
ॐकारेश्वर (नर्मदाकाठ च्या कविता ) ******** श्रद्धेचा व्यापार खुळखुळे भक्ती तरी देवा तिथे दिसे तुझी वस्ती इथे पूर्ण होती किती ...
-
दुरावल्या मितास ************* नशिबाने कधीकधी मित असे मिळतात न मागता जीवनात स्वर्ग जे फुलवतात । कळत नकळत जे जिवलगही होतात तरी ...
-
पळस **** तो आकाशात झेपावणारा पळस सुंदर आणि हिरवागार जेव्हा कोसळला भूमीवर झेलत घाव देहावर मग त्या विशाल पानांनाही धरला नाही...
-
तुझे डोळे ***** तुझे डोळे चांदण्यांचे बावरल्या हरीणीचे दूर कुठे अडकल्या गायीच्या गं दावणीचे . तुझे डोळे नवाईचे घनदाट...
-
वाट (नर्मदा काठावरील कविता) ******* देही सजलेली वाट मळलेली उधळून माती नभी दाटलेली तीच तीच वाट जरी पायाखाली हर दिन नव्या स्पर्...


