गुरुवार, २३ ऑक्टोबर, २०१४

तू म्हणजे तुझे प्रेम






तू म्हणजे
तुझे प्रेम
अन
तुझे माझ्यावरील
प्रेम म्हणजे
एक
प्रश्न चिन्ह
पण  
माझे तुजवरील
प्रेम म्हणजे
तुझ्यावरच्या
कविता
या कविता
म्हणजे
मला मिळालेले
जीवनाचे
प्रयोजन
अन तू जरी
दुरावलीस
तरीही
हे प्रेम
तसेच राहीन
कारण
बरसणाऱ्या सुगंधावर
फुलांचा हक्क
कधीच नसतो

विक्रांत प्रभाकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...