सोमवार, २० ऑक्टोबर, २०१४

तुझ्या हास्याचे तुषार






तू थकलेल्या मनाने
डोळ्यात सांज ओढून
दु:खाच्या काठावरती
जेव्हा असते बसून
लाखवेळा मनी माझ्या
विचार येती दाटून
द्यावा तुजला आधार
केवळ तुझा होवून
तू हसावे झऱ्यागत
मुग्धपणे खळाळून
तुझ्या हास्याचे तुषार
अन मी घ्यावे झेलून

 विक्रांत प्रभाकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पडणाऱ्या झाडास

पडणाऱ्या झाडास ************ झाड पडू आले झाडा कळू आले  वेलीनी सोडले बंध सैल आले घनघोर कुठले वादळ    उपटली मूळ अर्ध्यावर  कुठल्या ...