एकादशी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
एकादशी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, १६ ऑगस्ट, २०२६

विठ्ठल दर्शन आषाढी

विठ्ठल दर्शन (आषाढी)
*****************

पाहिला मी देव उभा विटेवर 
सावळा सुंदर मनोहर

पाहिला ना वेष नच वा मुकुट 
चंदनाचा नीट गंध उभा 

पाहिले न हार नच वा पुजारी 
कमान रुपेरी समोरील 

मुखावर डोळे होते खिळलेले 
शब्द विरलेले मनातील 

आले न मागणे काहीच सांगणे 
एक शून्य गाणे भरलेले 

होते खेचणारे जरी ओढणारे 
पापण्यांची दारे मिटली ना 

युगांची तहान मिटली वाढली 
स्पर्शा न कळली पदावर 

विक्रांता कळेना काय ते घडले 
शब्द न उरले सांगावया

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

विठ्ठल दर्शन आषाढी

विठ्ठल दर्शन (आषाढी) ***************** पाहिला मी देव उभा विटेवर  सावळा सुंदर मनोहर पाहिला ना वेष नच वा मुकुट  चंदनाचा नीट गंध उभ...