सोमवार, २६ जानेवारी, २०२६

जाणणारा

जाणणारा
*******

सर्व काळी सर्व रूपा धरूनिया आहे कुणी 
असे तत्व अगोचर जाणले का काय कुणी 

जाणण्यात जाणणारा पूर्ण असे बुडलेला 
जाणण्याचा भाव तरी असे मनी उगवला

उगवते जग डोळा तीन रुपी तिन्ही वेळा 
काय गुणातीत दिसे इथे कुणा रंगलेला 

कळण्याचा भ्रम सारा काचेवरी जणू पारा 
प्रतिबिंबा आणी काय खरोखर कोणी घरा

खरे काय खोटे काय कळाया उपाय नाही 
प्रश्नासवे उत्तराला  घेतसे गिळून काही

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वसुबारस निमित्त

वसुबारस निमित्त  *************** एक एक वासराला  घट्ट जीवाशी धरावे  कालवडी जगवून  नच गोऱ्ह्यास मारावे  तर तुम्हासाठी खरा सण वसूबा...