हरवला दत्त
***
हरवला दत्त इथल्या गर्दीतनिघाला शोधीत निवाऱ्याला ॥१
पावलोपावली लागतात ठेचा
पथ माणसांचा हरवला ॥२
घुसमटे श्वास सोनियाच्या धुरी
क्रूर वाटमारी जागो जागी ॥३
कोटी प्रार्थनाचा चाले गलबला
स्वर थकलेला हर एक ॥४
तारावे कुणाला मारावे कुणाला
हात थबकला करुणेने ॥५
जगून मरणे मरून सुटणे
घट्ट तरी जिणे लोंबकळे ॥६
कर्म दरिद्रयाची रेषा या शहरा ?
काय देवा झाला निरुपाय .? ॥७
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘ 🕉️
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा