ज्ञानेश्वरी
******
गीतेच्या मांडवी वेल ज्ञानेश्वरी कुसुम कुसरी सजलेली ॥१
एकेक शब्दाच्या अगणित छटा
वाटेतून वाटा मोक्षाच्या गा ॥२
काव्य कौतुकात रंगता जीवन
जाते हरवून सहजच ॥३
अर्थाच्या एखाद्या मनस्वी स्पर्शात
मृत्यूचे संघाट हरवती ॥४
ऐसी दैवीवाणी होणे पुनरपी
नाही रे कदापी इये लोकी ॥५
अगा मराठीया इथे जन्मलेल्या
ओलांडून भाग्या जाऊ नको ॥६
ओवी श्रवणी वा येऊ देत मुखात
जन्म पै सुखात नांदशील ॥७
नाही रे सांगत विक्रांत मनीचे
संतांच्या मुखीचे अनुभव हे ॥८
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘ 🕉️
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा