इंद्रायणी तीर
************
कृपेस कारण इंद्रायणी तीर वाहते अपार माय माझी ॥
सुंदर साजरा दोन्ही तीरी घाट
मिरवितो वाट कैवल्याची ॥
जरा उंचावर सवे सिद्धेश्वर
बैसले ज्ञानेश्वर महाराज ॥
सातशे वर्षाच्या प्रवाह पावन
भाव भक्ती लोण जगी वाटे ॥
अगा उद्धरले कोटी कोटी जीव
सजीव निर्जीव इये तीरी ॥
जन्मोजन्मी केले असे पुण्य काही
म्हणून वाट ही सापडली ॥
माय ज्ञानदेव बाप ज्ञानदेव
कृपेचे लाघव डोईवरी ॥
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘ 🕉️
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा