कोजागीरी पौर्णीमा
***************
पौर्णिमेच्या चांदण्यात अवचित आलीस तूघेऊनिया गुढ रम्य लावण्याचा आभास तू ॥ १
चांदण्यात भिजलेली मुर्त मर्मरी होतीस तू
मोहाचा डोह गर्दसा मेघ घननीळ झालीस तू ॥२
भांबावलो न स्मरे आज काय ते बोललीस तू
थांबलीस काळ काही क्षण ते कोरून गेलीस तू ॥
जातांना जरा वळून डोळ्यांत अवखळ हसून
येत अचानक मिठीत आग युगाची झालीस तू ॥४
छातीवर डोके ठेवून गंध मोगरी प्राणात भरून
दोन निखारे ओठावरती पेरूनिया गेलीस तू ॥५
झालो धुंद असा की मी वेडेपणा प्राणात रुजून
कळल्या वाचून मजलाही गाणी मनी पेरलीस तू ॥
जन्म जरी गेला वाहून हात हातीचा आणि सुटून
गेलो वाहत काळौघी तरीही माझ्यात उरलीस तू ॥ ७
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com .
☘☘☘☘ 🕉️ .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा