निरुपाय
*****
फोफावतो निरुपाय सुटूनिया स्वप्न गाव ओठावरी मिटू जाते एक हृदयस्थ नाव
कुठे देव सुटतात कधी व्रत मोडतात
मांडलेली पूजा भिते दीप विझु लागतात
तेच गीत कानी येते ठेक्यावरी मन गाते
ठेच लागे उंबऱ्यात आणि दूध उतू जाते
बांधलेल्या दिशा साऱ्या पायवाटा बंदीशाळा स्वतःवर सक्ती स्वतः चाकोरीत चालण्याला .
चंद्रही दिसत नाही मोकळे आकाश कधी
एक गाठ मारलेली रुततच जाते हृदी
दत्ता तुझे चालवणे आहे किती अवघड
स्वप्न ओझे जन्मावरी मन होत आहे जड
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com .
☘☘☘☘ 🕉️ .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा