दास
****
हीन दीन दत्ता तुझा मी रे दास घेई हृदयास मजलागी ॥
नाही पुण्य गाठी नाही सेवा काही
तूच तुझा देई बोध मज ॥
जाणतो अजून बहु चालायचे
तुज भेटायचे तप थोर ॥
चालतो पांगळा पाहतो आंधळा
येता तुझ्या दारा दया घना ॥
म्हणुनिया माझ्या मनी काही धीर
होऊ दे उशीर मर्जी तुझी ॥
तुझ्या पालखीचा असे मी रे भोई
करूनिया घेई सेवा रुजू ॥
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com .
☘☘☘☘ 🕉️ .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा