ज्ञानदेव
******
अगा त्या शब्दात चालता फिरता धरूनिया हाता ज्ञानदेवा ॥
तेथे थांबे मन जगाचे चलन
अहंचे स्फुरण शून्य मात्र ॥
पाहे एकटक जाणिवेचा डोळा
होऊनी आंधळा जगताला ॥
दिसते जगणे प्रकाश उरले
रंध्रात पेरले आत्मभान ॥
विक्रांत नमतो विक्रांता लवून
विक्रांत भरून ज्ञानदेव ॥
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com .
☘☘☘☘ 🕉️ .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा