बुधवार, ३० ऑक्टोबर, २०२४

नाते


नाते
****
भुई खिळलेले डोळे 
भाव पुसलेले खुळे 
तरी गंध परिमळे 
भरुनिया नभ निळे ॥१

नको सखी बाई अशी 
उगाचच शेला ओढू 
पापण्यात अडलेले 
काजळ ते उगा काढू ॥२

भेट तर होणारच 
जग फार मोठे नाही 
कोण भेटे कोण घटे 
नदीला त्या ठाव नाही ॥३

मागील ते जाऊ दे गं
सूर्य उगवतो नवा 
नात्याविन नाते कुठे 
शब्द कशाला ग हवा ॥४

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

दत्त व्हावे

दत्त व्हावे ******** इथे तिथे मज दिसो दत्त फक्त जगण्याच्या आत एकमेव ॥ नको माझेपण जीवनाचे भान   व्यापून संपूर्ण राहो दत्त ॥ कुणा ...