वात
***
आकाराची वात चालली जळत प्रकाशाचे गाणे गात अंतरात
हरवत तम चार भिंतीतला
बाहेर जरी का वारा वादळला
कुणा न मागणे कुणा न सांगणे
स्निग्ध भिजलेले चैतन्य ते साने
अंधाराचा राग ना रात्रीशी वैर
उधळत तेज ज्योत राही स्थिर
जन्म प्रकाशाचा धर्म चैतन्याचा
नसे खेद श्लाघा तया जळण्याचा
ऐसा जन्म देई मज प्रभू दत्ता
तुझ्या गाभाऱ्याचे भाग्य यावे माथा
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com .
☘☘☘☘ 🕉️ .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा