रविवार, ३ मार्च, २०२४

तथ्य


तथ्य
****
थांबलेला श्वास विरलेला स्वेद 
जगताचा भेद मावळला ॥१

कागदाची गत जैसी वादळात 
तसे रे अस्तित्व हरवले ॥२

पेल्यातला रंग सांडावा नदीत
तैसे समग्रात मन जाई ॥३

कणकण जणू होतं विघटीत 
देहाचे गणित कळू ये ना ॥४

सारे अट्टाहास उगा असण्याचे 
आजचे उद्याचे व्यर्थ झाले ll ५

आले स्वप्नभान जगता स्वप्नात 
निद्रा जागृतीत भेद नाही ॥६

दिसते म्हणून असते जगत 
तथ्य दिसण्यात अन्य नाही ॥७
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ ,🕉️ 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

घ्यावे जगून

घेई जगून ******** जाण्याआधी हातातून  जीवन आपल्या निसटून  आषाढाचा पाऊस होऊन धुंदपणे  घ्यावे जगून  क्षणोक्षणी आनंदाचे  झरे येतात उ...