जीवना
******
नक्षत्रांनी ठरवलेले भाग्य आणि ग्रहांनी मांडलेले सौख्य
खरे असतात की नाही ठाऊक नाही
पण जगण्याच्या अंगणात पडलेल्या
या काचा कवड्या वेचतांना
आणि सांभाळतांना झालेला आनंद
तो कुठल्याही पत्रिकेत मांडता येत नाही
ते मातीमध्ये मळलेले हात
धुळींनी भरलेले कपडे
किती अनमोल असतात
हे कुठलेही जवाहरला कळत नाही
खरंच का प्रारब्धाने भेटतात
हे सवंगडी मित्र मैत्रिणी
नाव गाव चेहरे वेगळे असतात
तरीही प्रत्येकाच्या जीवनात
बहरतात हे वर्षा ऋतू
भक्तीशिवाय मिळणारी
तपस्येविना फलद्रूप होणारी
ही कुणाची कृपा असावी ..
तना मनाला निववणारा
न मागता मिळणारा
हा कुणाचा प्रसाद असावा ..
जीवना तू खरच सुंदर आहेस
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा