खळांची व्यंकटी
*************
दम्भो दर्पोऽभिमानश्च क्रोधः पारुष्यमेव च।अज्ञानं चाभिजातस्य पार्थ सम्पदमासुरीम्।।16.4।। भगवद्गीता !
पारुष्यमेव=काठिण्य अभिजातस्य = जन्मास येणे
तर ही अशी माणसं समोर येऊन उभी ठाकली तर काय करायचं ?आणि एक ते तीन श्लोकामध्ये वर्णन केलेले दैवी गुण अजून आपल्यात उतरले नाही तर काय करायचं?
जग हे त्रिगुणांनी भरलेले आहे त्यामुळे सात्विक राजसिक तामसिक लोक ही तर भेटणारच.
तेव्हा त्या व्यक्तीचाही स्वीकार करायचा त्याच्या रागाचा, अहंकाराचा, काठिण्याचा, दर्पाचा सुद्धा. कारण त्या बिचाऱ्याला काय ठाऊक आहे तो कुठे आहे, ते जर त्याला कळते तर तो तिथे नसता ना.
सात्विक माणसाच्या केल्या गेलेल्या छळाचा प्रतिवाद सात्विक माणसाकडे नसतो तर सात्विकतेचे रक्षण करणाऱ्या परमेश्वराकडे असतो. तो त्याचे ब्रीद कधीही मोडत नाही. त्यामुळे हा शरणागतीचा भाव घेऊन त्या परमेश्वराच्या दारात सर्वांसाठी ज्ञानदेवांनी दिलेले पसायदान मागणे हेच आपल्या हातात असते.
जे खळांची व्यंकटी सांडो | तया सत्कर्मी रती वाढो
भूता परस्परे जडो | मैत्र जीवांचे.|
डॉ.विक्रांत तिकोणे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा