काय सर आज कुठ ?
बजेट मिटिंग !
कितवी ?
कुणास ठावूक !!
कशाला ?
का रे बाबा,आम्हीच
भेटलो काय !
बर उद्या ?
उद्या परीक्षेला
परीक्षक ,
नंतर ?
तेच ते नेहमीचं
रिपोर्टक
गुलाम ऐ संगणक !
कधी सक्तीचा
प्रेक्षक
तर कधी अंगरक्षक .
असं किती दिवस ?
नाही रे बाबा ,
यातून सुटका नाही
.
राजे येतात राजे
जातात
पण कायम असते
बैठक !
सोडून टाका रे हे
सर,
बर नाही वाटत !
जावू दे रे बाबा
हत्ती गेला
आता शेपूट राहिलं
आणि निरुपद्रवी
प्राण्यांचं
शेपूटच करतं जास्त
वळवळ !
म्हणायला उगा हत्तीचं
म्हणायचं
पण असतं पालीचच .
फक्त टाकून पाळता
येत नाही
एवढंच.
बरं चल जातो आता
खूप झाली वळवळ !
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा