तीच जुनी उर्मटता
हक्काआड दडलेली
इवलीशी खेचाखेच
आकाशाला भिडलेली
काही झाले तरी
इथे
मी मी तू तू ठरलेली
सराईत तलवार
मर्मस्थळी
घुसलेली
कुणा काय मिळे
इथे
कुणी काय घालवले
तळ्यातल्या
माश्यातच
पाण्यासाठी युद्ध
चाले
जिंकणारा हरणार
उपरा लोणी खाणार
हे तो ठरलेले
सारे
तरी खेळ चालणार
चल गड्या सोड आता
सराई ही सडलेली
नदीकाठी तरुतळी
दुनिया ती भारलेली
देव माझा दिगंबर
राहवया घर नाही
टीचभर जागा तरी
अहंला आधार नाही
विक्रांत प्रभाकर
तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा