तो किनारा मनातला
पुन्हा खुणावू
लागला
दाह पेटून उरात
नयनी झरू लागला
तू बोलावशील
केव्हा
मज ते ही ठाव
नाही
मी प्रतिक्षा मी गवाक्ष
मज अन्य भाव नाही
तू कोंडुनिया
मजला
का हकारी त्या
पथासी
मखमली कुरूपता
का पुनःपुन्हा
दावसी
मी जाणले ते कधीच
तव हाकेस थांबलो
म्हणताच मज ये
तू
बघ आता मी निघालो
विक्रांत प्रभाकर
तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा