शुक्रवार, २२ जानेवारी, २०१६

एक बॉस बाबा









बाबा का अडवतो? कुणासा ठाऊक !
बाबा का सडवतो? कुणास ठावूक !
असा कसा वागतो कुणा न कळते !
कश्यासाठी चिडतो कुणा न वळते !
बाबाच्या डोक्यात जणू हजारो किडे
अन सारेच हिशोब जाती खिश्याकडे
बाबाचे चालणे म्हणजे साऱ्याचेच मरणे
बाबाचे सांगणे असते गोल गोल फिरणे
बाबाला सेवेसाठी लागे सदा गाडी मोठी
आणि एक लवाजमा बडा असा पाठी
बाबाचे सारेच नेहमी असे आगळे वेगळे
दुनिया असते गोल हे बाबालाच कळले
बाबा लहाना झोडणारच हे तो ठरलेले
बाबा थोरास जोडणारच हे तो लिहिलेले
बाबाची दानत असे कैन्टीन वडा जेवण  
त्यासाठी ऐकायाचे पण दोन तास प्रवचन  
बाबाचे मीपण असे आकाशाला भिडलेले
कोडे हे की तेच बोल रोज तो कैसा बोले
बाबाचा खोटा धाक अन नाकावरचा राग
हाताची आपटण असे नाटकाचाच भाग
बाबाच्या हिकमती आणि गुप्त करामती
माहीत जगा तरी समजे तोच महामती
आले किती गेले कुणासही नाही कळले
कळत नाही बाबा हा कधी सोडेल डबोले
रात्रंदिन लागे मागे स्वास्थ्य नाही कुणा
उगाचच होणे हिटलर हा तर वेडेपणा  
माणसाची तमा किंवा केला ना सन्मान
किती शाप माथ्यावर नाही तया जाण
सारे जग बाबाचे फक्त स्वत: पुरते
अहंच्या अंधारात उगा भिर भिरभिरते
मागे पुढे जमा जरी तोडपूजे ते सारे
एकटाच फिरे बाबा अन एकटाच उरे
जाईल सोडून जेव्हा कधी हा राजपाट
आनंदाने विस्मरणात टाकतील हे भाट
विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...