शनिवार, २३ जानेवारी, २०१६

मावळतीचे पिवळे ऊन








मावळतीचे पिवळे ऊन  
वदले मज हलके स्पर्शून
बघ जायचे असेच निसटून  
कुणालाही कळल्यावाचून  

पक्षी आले घरटी परतून
वृक्ष उभे रव सारा मिटून
एक सावळी छाया हलकी
उभी क्षितिजी हात पसरून

श्वासामधले जडसे जगणे
उत्सुक सावध अन गांगरून
जरी उद्याचे कोडे अवघड  
रोज पडते सुटल्या वाचून

विझली पाने विझले अक्षर
मिटले मीपण तम होवून
चाचपडता मार्ग हरवून   
हरखून जाय क्षणात जीवन     

विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सुटू द्यावे

सुटू द्यावे ******* असते सदैव साथ का कुणाची  सुटतात हात सुटू द्यावे ॥ खेळ जीवनाचा पहायचा किती  मिटतात डोळे मिटू द्यावे ॥ हातात न...