जेव्हापासून कळले मजला कि जीवनाचे नाव मरणे आहे . डोक्यास बांधून कफ़न मी ,त्या मारेकऱ्यास शोधतो आहे. (अनुवादित)
सोमवार, २९ डिसेंबर, २०१४
रविवार, २८ डिसेंबर, २०१४
मेलेल्या बकऱ्याला
मेलेल्या बकऱ्याला
नाव नसते गाव नसते घर नसते दार नसते
प्रत्येक बकरा असतो
प्रथिनाचा ढीग
चविष्ट रुचकर
भूक वाढवणारा
चव जागवणारा
त्याचे हुंदडणे बागडणे
दुध पिणे चरणे
शिंग खाजवणे
सहज पुसून टाकता येते
विस्मृतीच्या फडक्याने
एका क्षणात
मालकाला धन मिळते
कसायाला फायदा
खाणाऱ्याला सुख ..
जन्मलेल्या प्रत्येक जीवाला
मृत्यू हा असतोच
असा नाहीतर तसा
त्याच्या देहाचे जन्माचे
सार्थक झाले
चला पान खावून येवू यात !
http://kavitesathikavita.blogspot.in/
शनिवार, २७ डिसेंबर, २०१४
देखणी
ती सुंदर गोरीपान
नाक डोळे छान असलेली
सुडौल तरुणी
अलीकडेच लग्न झालेली
सौभाग्याची लेणी नवी
देही मिरवणारी
जेव्हा काढू लागे
रस्त्यावरील कचरा
मुन्सिपाल्टीच्या गणवेशात
घेवून खराटा हातात
येणाऱ्या जाणाऱ्या असंख्य नजरा
उंचावत थबकत तिला न्याहाळत
काहीश्या नवलाने अचंब्याने
आणि खूपश्या वैषम्याने
अन जाता जाता बरेचसे ओठ
उगाचच वाकडे होत
ती सराईतपणे
इकडे तिकडे पहिल्या वाचून
आवरत असे आपले काम
जोडीदारीनीला देत साथ
एक एक ढीग उचलत
ढकल गाडी पुढे सरकवत
अन माझ्या डोक्यात
कुठेतरी ऐकलेले ते वाक्य
पुनःपुन्हा तरळून जाई
“नक्षत्रावानी देखणी
आहे माझी पोर
नक्कीच सजवीन
कुण्या राजाचं घर “!
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/
गुरुवार, २५ डिसेंबर, २०१४
येशू आणि धर्मांतर
गोठ्यात जन्मलेला
क्रुसावर वधला गेलेला
येशू ख्रिस्त ..
तुमच्या आमच्या सारखा
खराखुरा माणूस
पण प्रभूप्रेमाने मस्त झालेला
आत्मभान आलेला
अवलिया ...
तत्वासाठी मृत्यू स्वीकारणाऱ्या
विरळया माणसांपैकी
एक अलौकिक व्यक्तिमत्व ...
त्याचे देवत्व वादातीत आहे
परमहंसागत..
पण धर्मांतर हा शब्द
त्या महात्म्याला
माहित असेल की नाही
या बद्दल मला शंकाच आहे
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
द्वैत
द्वैत ***** चंद्र चांदणे तुझेच होते सुरेल गाणे तुझेच होते मंत्रमुग्ध मी नयनी तुझ्या असणे सारे तुझेच होते ॥ वारा किंचित असल्...

-
मोकळे केस तू ! रुपेरी कांतीचे लेवून चांदणे मोकळे केस तू मिरवित येते काजळ कोरले दिठीत सजले गाली ओघळून तीट लावते चालणे त...
-
तुझे डोळे ***** तुझे डोळे चांदण्यांचे बावरल्या हरीणीचे दूर कुठे अडकल्या गायीच्या गं दावणीचे . तुझे डोळे नवाईचे घनदाट...
-
द्वैत ***** चंद्र चांदणे तुझेच होते सुरेल गाणे तुझेच होते मंत्रमुग्ध मी नयनी तुझ्या असणे सारे तुझेच होते ॥ वारा किंचित असल्...
-
देव देश अन धर्मासाठी ********** जन्म देवासाठी जावो हा सगळा भावभक्ती मळा फुलो सदा ॥ देह देशासाठी जावो हा सगळा ...
-
भेटीचा सोहळा भेटीचा सोहळा जाहला आगळा चंद्र वितळला डोळीयात ॥ बाहुत भिजला शरद कोवळा दवात न्हाईला सोन सुर्य ॥ जिव...
-
महात्मा ज्योतिबा फुले ****** ज्योतीबा, तू लावलेल्या वटवृक्षांच्या सावलीत जगत आहोत आम्ही समतेची स्वातंत्र्याची फळे चाखत आहोत आम्ह...
-
नोकरीचा प्रवास ************ हा प्रवास सुंदर होता या महानगरपालिकेतील नोकरीचा हा प्रवास सुंदर होता आणि या सुंदर प्रवासाचा हा श...
-
रंग ***" उधळलेस रंग किती रंगीत झाले जीवन सरुनही सण सारे उतरती न अजून ॥ रंग तुझ्या डोळ्याचे रंग तुझ्या स्पर्शाने रंग तु...
-
डॉ उषा म्होप्रेकर मॅडम माझी प्रिय बॉस (श्रद्धांजली ) ************************ चंद्राची शीतलता आणि सूर्याची तप्तता धारण केलेले...
-
दुपार ***** वारा सळसळ करतो हलके क्षणात दृश्य करतो बोलके फांदी वरचे फुल सावरते पराग आपले उधळून देते पाना मधला पक्षी पिव...