जेव्हापासून कळले मजला कि जीवनाचे नाव मरणे आहे . डोक्यास बांधून कफ़न मी ,त्या मारेकऱ्यास शोधतो आहे. (अनुवादित)
सोमवार, २९ डिसेंबर, २०१४
रविवार, २८ डिसेंबर, २०१४
मेलेल्या बकऱ्याला
मेलेल्या बकऱ्याला
नाव नसते गाव नसते घर नसते दार नसते
प्रत्येक बकरा असतो
प्रथिनाचा ढीग
चविष्ट रुचकर
भूक वाढवणारा
चव जागवणारा
त्याचे हुंदडणे बागडणे
दुध पिणे चरणे
शिंग खाजवणे
सहज पुसून टाकता येते
विस्मृतीच्या फडक्याने
एका क्षणात
मालकाला धन मिळते
कसायाला फायदा
खाणाऱ्याला सुख ..
जन्मलेल्या प्रत्येक जीवाला
मृत्यू हा असतोच
असा नाहीतर तसा
त्याच्या देहाचे जन्माचे
सार्थक झाले
चला पान खावून येवू यात !
http://kavitesathikavita.blogspot.in/
शनिवार, २७ डिसेंबर, २०१४
देखणी
ती सुंदर गोरीपान
नाक डोळे छान असलेली
सुडौल तरुणी
अलीकडेच लग्न झालेली
सौभाग्याची लेणी नवी
देही मिरवणारी
जेव्हा काढू लागे
रस्त्यावरील कचरा
मुन्सिपाल्टीच्या गणवेशात
घेवून खराटा हातात
येणाऱ्या जाणाऱ्या असंख्य नजरा
उंचावत थबकत तिला न्याहाळत
काहीश्या नवलाने अचंब्याने
आणि खूपश्या वैषम्याने
अन जाता जाता बरेचसे ओठ
उगाचच वाकडे होत
ती सराईतपणे
इकडे तिकडे पहिल्या वाचून
आवरत असे आपले काम
जोडीदारीनीला देत साथ
एक एक ढीग उचलत
ढकल गाडी पुढे सरकवत
अन माझ्या डोक्यात
कुठेतरी ऐकलेले ते वाक्य
पुनःपुन्हा तरळून जाई
“नक्षत्रावानी देखणी
आहे माझी पोर
नक्कीच सजवीन
कुण्या राजाचं घर “!
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/
गुरुवार, २५ डिसेंबर, २०१४
येशू आणि धर्मांतर
गोठ्यात जन्मलेला
क्रुसावर वधला गेलेला
येशू ख्रिस्त ..
तुमच्या आमच्या सारखा
खराखुरा माणूस
पण प्रभूप्रेमाने मस्त झालेला
आत्मभान आलेला
अवलिया ...
तत्वासाठी मृत्यू स्वीकारणाऱ्या
विरळया माणसांपैकी
एक अलौकिक व्यक्तिमत्व ...
त्याचे देवत्व वादातीत आहे
परमहंसागत..
पण धर्मांतर हा शब्द
त्या महात्म्याला
माहित असेल की नाही
या बद्दल मला शंकाच आहे
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
पुन्हा एकदा
पुन्हा एकदा ********* पुन्हा एकदा आकाश चांदण्यांनी भरून गेले पुन्हा अनाम सुखाने मन बहरून गेले ॥ तेच स्थळ तीच भेट देहातील आवेग थ...
-
मोकळे केस तू ! रुपेरी कांतीचे लेवून चांदणे मोकळे केस तू मिरवित येते काजळ कोरले दिठीत सजले गाली ओघळून तीट लावते चालणे त...
-
ठसा **** जया प्रकाशाची हाव ज्याचे आकाशाचे गाव त्याचे दत्तात्रेय ठाव ठरलेले ॥१ जया कळते बंधन जरा जन्माचे कारण तया दत्ताचे स...
-
गिरनार परिक्रमा *********** सरला प्रवास परी तुझा भास वेढून मनास आहे दत्ता ॥१ माझे पदरव मज ऐकू येती तरंग गुंजती पाण्यावर ॥२ पा...
-
दत्त आकाश ********* दत्त आकाश कोवळे ओल्या पहाटे फुटले माझे मन डवरून दव चिंब ओले झाले दत्त प्रकाश किरण आला मेघुटा ...
-
पुन्हा एकदा ********* पुन्हा एकदा आकाश चांदण्यांनी भरून गेले पुन्हा अनाम सुखाने मन बहरून गेले ॥ तेच स्थळ तीच भेट देहातील आवेग थ...
-
झाकलिया घटीचा दिवा । नेणिजे काय झाला केधवा । यारीती जो पांडवा । देह ठेवी ...ज्ञानेश्वरी मरण ***** असे हवे रे सुंदर मरण ज्यात ओघळून जाईल ज...
-
कवितेचे रसग्रहण . मनोगत दुसऱ्या कोणत्याही कवितेचे रसग्रहण करणे म्हणजे आपल्या चष्म्यातून त्याचे जग पाहणे असते . ते पाहणे आपल्या क...
-
तुझे डोळे ***** तुझे डोळे चांदण्यांचे बावरल्या हरीणीचे दूर कुठे अडकल्या गायीच्या गं दावणीचे . तुझे डोळे नवाईचे घनदाट...
-
तेजे सिस्टर ******* माझ्यासाठी तेजे सिस्टर म्हणजे अतिशय सोपे सरळ व्यक्तिमत्त्व जेवढ्यास तेवढे बोलणाऱ्या कमीत कमी बोलणाऱ्या कामापुरत...
-
पालव ****** भक्तीचा भिकारी दत्ता मी रे बरा नको देऊ मला मोठेपणा ॥१ जाणतो मी माझे मूल्य ते इवले तार्यांनी भरले आभाळ हे ॥२ प्रत्...