सोमवार, ९ मार्च, २०२६

प्रार्थना

प्रार्थना
*******
जाहले दर्शन तृप्त झाले मन 
देखीले सगुण 
परब्रम्ह 
हास्य मुग्ध मुखी हात उंचावले 
आशिष भरले 
प्रेममय 
परमपवित्र थोर गुरुतत्व 
मंत्र मुग्ध मन 
पाहूनिया 
उमटे प्रार्थना शब्दाच्या वाचून 
शब्दाच्या वाचून 
ये आशिष 
पूर्णानंद काया पूर्ण करा आता 
संकल्पाची गाथा 
मनातील 
येणे हा विक्रांत होईल पावन 
सफल जीवन 
पूर्णपणे

विक्रांत प्रभाकर तिकोणे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

उपाधी

उपाधी *****" जडू नये कधी  ज्ञानाची उपाधी  अभिमान नदी बुडू नये भार पुस्तकांचा घेवू नये माथा तेच शब्द वृथा बोलणारा  आत्म विस्...