शुक्रवार, ६ मार्च, २०२६

तपोवन@ (उत्तर वाहिनी नर्मदा)

तपोवन
*******
तृप्त तपोवन 
आनंद भुवन 
चैतन्य सघन
श्री गुरु भवन
 
सुंदर सकळ 
रेवामाई तीर 
निर्मळ नितळ 
सलील केवळ

निर्भय सुस्वैर
हंबरे गोधन
वृक्ष वृक्षावर 
पक्ष्यांचे कुंजन 

गर्द घनदाट
मुग्ध आमराई 
चिकू बेलफळ 
पोफळीची राई 

साई मूर्त शांत
अन् नित्यानंद
कुंडी स्वामी सवे
भोळा सदानंद 

तत्पर भाविक
प्रसन्न सेवक 
सदा कार्यरत 
घडते कौतुक

असा हा विरक्त
मठ आत्ममग्न
जणू की काशी 
कृपेस कारण

विक्रांत निवांत 
कृपेचा चातक 
दारात गुरूंच्या 
होवून याचक 
 
विक्रांत प्रभाकर तिकोणे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

नर्मदेच्या काठावर

नर्मदेच्या तीरावर  ************ रस्त्याच्या घड्याळावर पायाचे काटे चालतात अंतर हीच वेळ असते असा प्रवास चाले सतत  कधी भेटतो तीर सु...