शनिवार, १४ नोव्हेंबर, २०१५

तुझी आठवण









खरच सांगतो
आता न येत
तुझी आठवण
फारशी मनात

जगतो धावत
चक्री अडकत
करी वणवण
उगा दिनरात

थकती गात्रे
प्राण विझती
मृत देहास
कुठली स्मृती

तुझे असणे
होते कधी पण
जगण्यामधले
हळवे स्पंदन

उगाच चालल्या
श्वासा कारण  
उरी खेळती
वीज सणसण

जाता तू पण
गेलीस घेवून
माझे मी पण
कळल्या वाचून

अन आता मी 
जगतोय असे
भिजले विझले
जणू  कोळसे

कधी होते पण
जिवंत जळणे
सांगितल्या विन
असते सांगणे

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/


शुक्रवार, १३ नोव्हेंबर, २०१५

श्रीदत्त दिगंबर






पवन गतीने कोण चालले

तेज शलाके विश्व ढवळले

गिरनाराचे ते भाग्य उदेले

श्रीदत्त दिगंबर येथे वसले

महापुण्यवान करवीरस्थान

कि प्रभू मागती भिक्षापान

अहो भाग्याची माय जान्हवी

कि स्नान संध्या देवे करावी

आणिक रजनी अपूर्व माहुरी

जिच्या कुशीत निद्रिस्त मुरारी

कुठे नसे तो कुठे असे तो

सर्वव्यापी परी लीला दावितो

भक्त हृदयी सदैव वसतो

अल्प भक्ती अन धीर पाहतो



 विक्रांत प्रभाकर

http://kavitesathikavita.blogspot.in/

गुरुवार, १२ नोव्हेंबर, २०१५

सुलतान








http://allindiaroundup.com/news/was-tipu-sultan-the-great-or-a-tyrant-a-look-into-the-history/

अत्याचारी समशेर
उगारून प्रजेवर
गांजले छळले अन  
भ्रष्ट केले बळावर

जनानखाने भरले
पशु वृत्तीने भोगीले
म्हणे भूमिपुत्र तया
सदा मातेस लांछिले
 
श्रद्धेवरी घाव त्याने
पावित्रही विटंबले
स्वत:साठी भोगासाठी
फक्त रक्तास सांडिले

मरणाने मेला जरी
स्वतःसाठीच जगला
विष पण वाढवून  
कालवून इथे गेला

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/


भय

भय *** किर्र निर्मनुष्य अश्या  जयंती माता जंगलात  मऊ मातीत उमटलेली  ताजी व्याघ्र पावुले  अन् एकटेपणी  चाललेली माझी परिक्रमा . वि...