शनिवार, २३ फेब्रुवारी, २०१३

एकच नाम सतत




एकच नाम सतत l  माझिया हृदयात l 
आता आहे स्फुरत  l  श्री दत्त जय दत्त ll १ll  
माझे मन हासत l  आहे मजला सांगत l 
श्री दत्त स्मरणात l  सुख वाटे ll २ll  
पातलो समाधान l  शांतीचे वरदान l 
लाभता निधान l  श्री दत्त प्रेमाचे ll३ ll 

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

पाहतो ते फक्त...



आजकाल मी कुणाचेही
चेहरे पाहत नाही
पाहतो ते फक्त पाय
काय म्हणता ?
आदराने !
त्यांच्यात देवत्व पाहून !!
नाही हो !
माझा पाय मुरगळून
तीन महिने झालेत
तेव्हा पासून !
फारच हेवा वाटतो हो ,
मला तुम्हा सर्वांचा
दोन तंदुरुस्त मजबूत पाय
खाड खाड चालणारे
दण दण पळणारे
यात काय सुख असते
ज्याचे पाय मोडतात
त्यांनाच कळते

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

गुरुवार, २१ फेब्रुवारी, २०१३

ॐकाराचा हुंकार





ॐकाराचा हुंकार l प्रगटला साचार l
होऊनि देहाकार l देव गजानन ll १ ll 
भावातीत ईश्वर l तया फुटे पाझर l
प्रेमलोट अपार l द्वैत सुखाचा ll २ ll 
अरुपाचा अनघट l पडदा सारत l
झाले घनीभूत l कैवल्यरूप ll ३ ll 
आनंदाचा कल्लोळ l सूर शब्द ताल l
अनाहताचा बोल l झाला प्रगट ll ४ ll 
रूप साजिरे घेवूनी l आले गुणातीत गुणी l
रक्त वर्णात सजुनी l पर्ण पिंपळावरी ll ५ ll 

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

अंतरी तोच तो






अंतरी तोच तो l बाहेर तोची तो l

सर्वाघटी नांदतो l दत्तात्रेय ll १ll  

सत्याच्या प्रकाशी l मिथ्याच्या अंधारी

सदा हात धरी l माझा देव ll २ ll  

प्रेमाने रागावे l थांबता हालवे l

चालत राहावे l मी म्हणुनी ll ३ ll  

त्याचे सुख मनी l भोगे जनी वनी l

काही त्यावाचुनी l नच प्रिय ll ४ ll 


विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

डॉ. मनीष दोशी Dy MS (I/C)राजावाडी हॉस्पिटल (निवृती दिना निमित्त)

डॉ. मनीष दोशी Dy M.S.(I/C) राजावाडी हॉस्पिटल (निवृती दिना निमित्त) ***************** खरे जे डॉ .मनीषला ओळखतात  त्यांना सांगायची ...