आषाढी एकादशी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
आषाढी एकादशी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, १२ ऑगस्ट, २०२६

देवदारी

देवदारी
*****
महापूर देवदारी 
भक्तांचा या आला आला 
पावूनिया पंढरीला
धन्य धन्य आज झाला ॥१

एक एक शिरोमणी 
भावभक्तीत न्हाईला 
एक एक मुखावर 
हर्ष सात्विक दाटला ॥२

धवल गर्दीत त्यांचे 
मनही धवल झाले 
हात टेबलाखालचे 
बुक्का गुलाली रंगले ॥३

कोण खरा कोण खोटा 
प्रश्न मनास पडला 
अशा दुभंग चित्तात 
नाद मृदुंग कुठला ॥४

आले इतुकेच जन 
जर झाले पुण्यवंत 
भ्रष्ट जीवनाचा त्यांच्या 
जर करूनिया अंत ॥५

मुक्ती आणि वैकुंठाचा 
वृथा थांबेल रे शोध 
जन्म सुखावेल सारा
देह पंढरी हा होत ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

शनिवार, ८ ऑगस्ट, २०२६

पंढरपूर आषाढीनिमित्त

 
पंढरपूर (आषाढीनिमित्त)
********************
घरोघरी होती दुकानं थाटली 
पंढरी ती झाली मॉल जैसी ॥१
गल्ली बोळातून सामान विकती 
चहावाले किती दारोदारी ॥२
विकती खेळणी प्रसाद फराळ 
अबीर गुलाल कुण्या दारी ॥३
लॉजिंग बोर्डिंग किती घरे झाली 
कुटुंबे धाडली गावाकडे ॥४
जिथे जावे तिथे माणसे भरली 
जागा न उरली मुंगीसही ॥५
दिसली न पशु कुठे न पाखरे 
क्वचित ते कुत्रे एखादे रे ॥६
महाद्वारी खच लोंढे माणसांचे 
भरदिस साचे मध्य रात्री ॥७
नाद विठ्ठलाचा गजर माऊली 
अवघी जागली पंढरी ही ॥८

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

गणित

गणित ***** गणित या जगताचे नाही कुणास सुटत  सारे आकडे अस्थिर नाही कुणास कळत जगी कुणी  फुशारतो पुण्य राही मिरवत  दिसे तो ही सापडला...