देवदारी
*****
महापूर देवदारी भक्तांचा या आला आला
पावूनिया पंढरीला
धन्य धन्य आज झाला ॥१
एक एक शिरोमणी
भावभक्तीत न्हाईला
एक एक मुखावर
हर्ष सात्विक दाटला ॥२
धवल गर्दीत त्यांचे
मनही धवल झाले
हात टेबलाखालचे
बुक्का गुलाली रंगले ॥३
कोण खरा कोण खोटा
प्रश्न मनास पडला
अशा दुभंग चित्तात
नाद मृदुंग कुठला ॥४
आले इतुकेच जन
जर झाले पुण्यवंत
भ्रष्ट जीवनाचा त्यांच्या
जर करूनिया अंत ॥५
मुक्ती आणि वैकुंठाचा
वृथा थांबेल रे शोध
जन्म सुखावेल सारा
देह पंढरी हा होत ॥६
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘ 🕉️