ज्ञानाई
******
तुझिया मनीचे घाल माझे मनी ज्ञानाई जीवनी कृपा करी ॥१
कळू देत भक्ती अहंभावातीत
भाव शब्दातीत उरो मनी ॥२
जडू देत मूर्ति माय माझे चित्ती
सदा तुझी कीर्ती मुखी यावी ॥३
घेऊन कुशीत सांग गुज गोष्टी
सत्य स्वप्न दृष्टी कळो यावे ॥४
ज्ञानाचा भरून चोखट प्रकाश
जगण्याचा भास मिटो जावा ॥५
विक्रांत लेकरू घेई कडेवरी
जन्म येर झारी घालू नको ॥६
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘ 🕉️ .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा