*****
आनंदाची वाट आनंदे भरली
कृपा ओघळली अंतरात ॥१
ज्ञानदेवी माझ्या जीवाचा विसावा
पातलो मी गावा आनंदाच्या ॥२
अर्थातला अर्थ उघडे मनात
चांदणे स्पर्शात कळो आले ॥३
मिरवावे सदा तया त्या शब्दात
जगावे चित्रात रेखाटल्या ॥४
इतुकीच इच्छा उमटे चित्तात
निजावे पानात शब्द होत ॥५
विक्रांत हरखे सुखात तरंगे
भान झाले उगे भावर्थात ॥६
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘ 🕉️ .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा