माऊली
*******
तुझ्यापायी काही घडो हे जगणे ज्ञानाई मागणे हेच आहे ॥१
सरो धावाधाव मागण्याचा भाव
अतृप्तीचा गाव तोही नको ॥२
अर्भकाचे ओठी माऊलीची स्तन्य
कुशीचे अभय सर्वकाळ ॥३
तैसे माझे पण उरो तुझे पायी
नुरो चित्ता ठायी अन्य काही ॥४
विक्रांता प्रेमाची करी गे सावली
ज्ञानाई माऊली कृपनिधी ॥५
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘ 🕉️ .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा