दत्त कृपेनी
********
माझ्या असण्याचे भान जगण्याचे सार जाणिवेचे दिसू दे रे ॥
संत वचनात सत्य निर्देशित
उरात किंचित स्फुरु देरे ॥
मनास कळावे स्वरूप आपले
धूके दाटलेले विरू दे रे ॥
ज्ञानी सदोहर भेटतात आप्त
दावतात वाट कळू दे रे ॥
श्री दत्त दिसूनी हर्षित होवूनी
मजला कृपेनी भरू दे रे ॥
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘ 🕉️ .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा