दत्त देणे
******"
गुरु माझा दत्त प्रभू माझा दत्त आत्मदेव दत्त सर्वव्यापी ॥
पथी त्याच्या चालू जन्म सदोदित
जडो माझे चित्त तया पायी ॥
तया विन काही नुरे जगी पाही
भरुनिया राही तोच सारे ॥
त्याच्यासाठी घडो अगा सारे जिणे
तया विन जिणे जन्म नको ॥
अहंकार हा मरता शून्यवत होता
दत्त येतो हाता म्हणतात ॥
परी ते ही असे दत्ताचीच देणे
कृपेचे हे लेणे मिळो मज ॥
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘ 🕉️
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा