कळू यावे
*******
इथे तिथे कुठे शोधू शोधू जाता नच येतो हाता अर्थ काही ॥१
अंतरी बाहेरी कळू येते वार्ता
घट असे रिता सर्वकाळ ॥२
देऊळी शोधतो तीर्थ धुंडाळतो
परि ना दिसतो मार्ग काही ॥३
मिटूनिया डोळे ध्यानात नामात
प्रभूला शब्दात आळवतो ॥४
जरा कळू यावे कुण्या पाऊलात
अर्थ जगण्यात काय असे ॥५
देवा दत्तात्रेया ऐसे त्वा करावे
गिळूनिया घ्यावे अस्तित्व हे ॥६
भक्ती ज्ञानाविना जरी मी उंडारे
बांधूनिया घे रे पदी नाथा ॥ ७
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘ 🕉️ .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा