शनिवार, २८ डिसेंबर, २०२४

आधार

आधार
********

भिजल्या प्रश्नास कोरडे उत्तर 
ते ही बरोबर हवे कुणा ॥

रुजलेले बीज शुष्क माळावर 
किती जगणार कोणा कळे ॥

थकलेला देह यशाच्या शिखरी
वयाच्या उतारी किती काळ ॥

रोज नवी दिशा वाट नवी फुटे 
सरती संकटे काय कधी ॥

उतारी वाहतो प्रवाह पतित 
चाले हुडकीत सुख कुठे ॥

अवघे बुडती प्रश्नांच्या भोवरी 
शोधती आधारी सत्य काही ॥

घडो पुरुषार्थ जन्म जगण्याचा 
अर्थ कळण्याचा खुंटलेला ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

डॉ संजय चोगले

डॉक्टर संजय चोगले **************** जीवनात अनेक मित्र भेटतात  काही टिकतात काही हरवतात . काही विसरले जातात  काळोखात अन काळाच्या ओघ...