साधन
*****
श्वासाची या लय पाहू पाहू जाता बिघडतो सांधा त्याचा तोही ॥१
मनाचा प्रवाह जुन्या बाजारात
स्वप्नाच्या गावात उधळतो ॥२
नामाचे साधन शब्दाचा आधार
यंत्र गरगर फिरतसे ॥३
शक्तीचा जागर गुरुचा आधार
भाग्याचा प्रकार दिसतो ना ॥४
गूढ व्यवहार प्रकाश प्रवास
ज्याचा असे त्यास चालण्याचा ॥५
कोणा काय भेटे ज्याचे त्यास ठाव
दत्त असे भाव विक्रांतचा ॥६
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘ 🕉️ .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा