मंगळवार, २४ डिसेंबर, २०२४

पुणे शहर


पुणे शहर
*******
सरले मिटले काल पुजियले 
माथी मिरवले मातब्बर ॥
जुनाट वाड्यांच्या काल झाल्या चाळी 
इमारत ओळी आज उभ्या ॥
नाव गाव गेले बखरी लिहिले 
पराक्रमी झाले कारकून ॥
कुणाच्या रक्ताने कोण राजे झाले 
ऐश्वर्ये वाढले होते कोण ॥
अजून चालती फुटलेली नाणी
कुण्या पूर्वजांनी वेचलेली ॥
चार गुंठियाचे चार कोट झाले 
पूर्वज पावले अनेकांना ॥
चाले गजबज पुराण शहरी 
शेजारी पाजारी हरवले ॥
काळाची पाऊले कुणाला कळती
घडती मोडती किती जग ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

व्यवहार

व्यवहार ******* नको हा  व्यवहार  वाटतो संसार  परी खांद्यावर  भार आहे ॥१ कळेना मज का हा जन्म चालला  अर्थ हरवला  इथे असा ॥२ हातात ...