मागत आहे
**********
या माझ्या नीरस जगण्यात तुझे गीत मी गात आहे
या माझ्या फुटक्या भांड्यात
तुझे प्रेम मी भरत आहे १
कधी करशील कृपा तू
नभ रिकामे दिसत आहे
पाश जाळती प्रारब्धाचे
तया तप मी म्हणत आहे २
दयाळा तुजला प्रेमे
माझा मी म्हणत आहे
सोडू नको कधी हात
हेच तुला मी प्रार्थित आहे ३
खूप चालून थकलोय
आता उगा राहत आहे
येई मजला घेऊन जाई
अवघे तुला मी वाहत आहे ४
कोण कुठला विक्रांत
वाळूकण जगत आहे
स्पर्श पावूलांचा तुझा
अन्य नच मी मागत आहे ५
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘ 🕉️
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा