उरणे
*****
या मातीच्या मंदिरात देव उतरत नाही वासनांचा गंध दर्प मिटता मिटत नाही ॥१
मंदिर हा शब्द फुका मनाला शोभत नाही
खूप कमी वेळ आणि काम उरकत नाही ॥२
ध्वस्त आता करावी ही इमारत रास्त नाही
हरवावे अवकाशी अन्य दुजी गत नाही ॥३
म्हणू देत कुणी भक्त उरला विक्रांत नाही
उरणे नकोच आता उरण्यात दत्त नाही ॥४
घे पांघरून जाळ हा पाचोळ्यात अर्थ नाही
उब उकरडी असे आग पण त्यात नाही ॥५
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com .
☘☘☘☘ 🕉️ .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा