म्हणौनि मागां सरों तंव संसारु । आडवीत येतसे अनिवारु ।
आणि पुढां तूं तंव अनावरु । न येसि घेवों ॥
ज्ञानेश्वरी ११:३२४आणि पुढां तूं तंव अनावरु । न येसि घेवों ॥
*************
मागे सरू जाता नावडे संसार
व्यर्थ नि असार जाणवतो ॥१
अडविते चित्त करे प्रतिकार
केर घरभर तैसा गमे ॥२
आणिक पुढती तू ही तो कळेना
हाती गवसेना काही केल्या ॥३
अनंत अगाध नाही ज्यास पार
इंद्रीय गोचर नाही कदा ॥४
अशा संकटात पडलो मी घोर
सुटून आधार मानलेले ॥५
बावरले मन गांगरले चित्त
स्वरूपात दत्त केव्हा होशी ॥६
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com .
☘☘☘☘ 🕉️
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा