रविवार, २२ सप्टेंबर, २०२४

आकाश


आकाश
*********

कधी पाहतो आकाश मी
माझ्यात सांडलेले 
हरवून  साऱ्या दिशा
अनंत जाहलेले 

तुटतात बंध खुळे 
देहात भरलेले 
एक विमुक्त गाणे 
उरते नभातले 

तू कोण कुठून आला 
हे प्रश्न मुळातले 
नुरतात अंश त्यांचे 
जणू बाष्प ऊन्हातले

ते नसतेच मागणे रे  
तेव्हा मागीतले 
ते असते रिक्त क्षणाने
सर्वस्व ओतलेले

ते येते असे उगाच 
वाटते मनास आले 
कळते इथेच होते 
पेशीत साठलेले .

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ .


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

उदे ग अंबे उदे ॥

उदे ग अंबे उदे ॥ *********** होऊ दे जागर आई प्राणात संचार होऊ दे वावर आई हृदयात हुंकार माझ्या अंबाबाईचा  माझ्या दुर्गा माईचा उदे...