शुक्रवार, ७ जून, २०२४

गाठ


गाठ
*****

गाठ अवचित पडे
जीवा भुलीचे साकडे 

तुझे व्याकुळले मन
माझे हरवले स्वप्न

प्रश्न गूढ तुझ्या डोळी 
माझे पायी गर्द जाळी 

तुझे जग चार भिंती 
माझी हरवली मिती 

तुझे  शिवलेले ओठ
माझे मौन घनदाट 

तुझे आषाढी आभाळ 
माझे  पुसले काजळ 

पाय फुटले वाटांना 
अंत कुठेच दिसेना

गाठ शून्याची नीरव 
त्यात हरवला जीव 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ .


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

विसर्जन

 विसर्जन ******** भर मध्यरात्री साडेबारा वाजता  ढोल ताशांच्या आवाजात  देव आणणे किंवा विसर्जन करणे हि काही भूषणास्पद आणि तर्क शुद...