शनिवार, १ जून, २०२४

तारा केदारे समाज विकास अधिकारी

तारा केदारे (समाज विकास अधिकारी)
********
 म, तु ,अग्रवाल रुग्णालयाच्या क्षितिजावर 
अचानक उगवला एक तारा 
सौम्य स्निग्ध चकाकणारा 
कुठलीही सूचना न देता 
कुठलाही गाजावाजा न करता 
आणि तळपत राहिला 
वाटेवर प्रकाश पाडत राहिला 
किती तरी लोकांच्या 

त्या ताऱ्याला 
नव्हतेच आकाश काबीज करायचे 
नव्हतेच नमस्कार स्वीकारायचे 
त्याला फक्त होते 
कृतार्थ चांदणे बरसायचे 

तो तारा भीत नव्हता 
कधी कुठल्या काळ्या मेघाला 
तो तारा जुमानत नव्हता 
कुठल्याही वादळाला

तो तारा जागत होता 
सहजपणे कर्तव्याला 
त्यात नव्हता आव कठला 
प्रचंड काही करण्याचा
नव्हते दर्शन प्रदर्शन
जाहलेल्या वेचाचा

पश्चिमेला रात्र घडता ढळता  
हलकेच निशा अस्त होता होता
उगवला होता तो तारा
उत्तर दिशा कुस वळवता वळवता 

एक प्रहर दोन प्रहर 
काळाला अर्थ नव्हता 
अर्थ होता देण्याला 
एक ओंजळ दोन ओंजळ
 माप नव्हते मोजायला 
अर्थ होता दातृत्वाला
 म्हटले या ताऱ्याला नाव द्यावे
 तो नावच त्याचे होते तारा 
**

निश्चित राहील त्यांची स्मृती मनात
कारण नावाप्रमाणे तळपणाऱ्या व्यक्ती
या जगात फार कमी असतात 
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बंधन

बंधन **** शब्दाच्या वाटेनं शब्दातिताच्या अंगणात जाणं तेवढे सोपे नसतं कारण आपल्याला शब्दाचा हात नाही सोडवत  दिसणारा प्रत्येक क्षण...