रविवार, २६ मे, २०२४

दीपक


दीप
******
सांजवता दिन दीप उजळला
दत्ताच्या समोरी हळूच  ठेविला ॥१

दीप प्रकाशला गाभारा भरला
तम दाटलेला क्षणी दुरावला ॥२

इवला प्रकाश झाला घरभर
अन पुढे किती गेला दूरवर॥ ३

मग मिटू गेले थकलेले डोळे
शब्दाविन शब्द काही मनी आले ll४

भाग्य या दिव्याचे देई मज देवा
जळत पदाशी मिळावा विसावा ll५

तुझाच अंधार अन हा प्रकाश 
परी पेटण्याची मनास या आस ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

1 टिप्पणी:

दहशदवाद

दहशतवाद  ********* मान्य आहे दहशतवादाला धर्म नसतो  हेही तेवढेच सत्य आहे की धर्मातच दहशतवाद जन्माला येतो  तीच तीच नावे तेच तेच ना...