दर्शन
******
स्वप्नी मज दिसले स्वामीजी आलेले
कधी तया पाहिले
होते मी डोळा ॥
निर्मळ कांती
डोळ्यात शांती
सुंदरशी मूर्ती
मन मोहक ॥
वदले नच काही
सुचवले वा काही
संभाषण तेही
जाहले ना ॥
घडे दृष्टी भेट
सुख होत त्यात
आनंद हृदयात
ओसंडला ॥
आणले जयांनी
हातास धरूनी
सोहम साधनी
कृपामय ॥
तयाचे दर्शन
गेले सुखावून
होय शुभ शकुन
चैत्र नवरात्री ॥
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘ .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा